वाडिया रुग्णालयासाठी आंदोलन

अत्यंत जुनं आणि लहान मुलांचं स्पेशलिस्ट असलेलं वाडिया रुग्णालय आता बंद होण्याच्या मार्गावर आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. त्यामुळे वाडियामधील सर्व रुग्ण, कर्माचारी आणि आजूबाजूच्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

रोहित पवारांचा राम शिंदेंना पुन्हा दणका

विशेष म्हणजे या आंदोलनात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी उपस्थिती लावली. मात्र त्याचवेळी शिवसेनेचे स्थानिक आमदार अजय चौधरीही यांचीही उपस्थिती लक्ष वेधून घेत होती. शिवसेना आमदार अजय चौधरी शिवडी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात.

तर वाडिया रुग्णालय हे त्यांच्या मतदारसंघात परळ येथे आहे. वाडियातील कर्माचाऱ्यांच्या आंदोलनात शर्मिला ठाकरेंसोबत आमदार अजय चौधरीही सहभागी झाल्याने मनसे आणि शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरु झाली होती. या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आणि मनसे कार्यकर्त्यांसह वाडिया रुग्णालयातील कामगार उपस्थित होते.

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.