InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘प्रवेश निश्चित होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार’; मराठा विद्यार्थांचा निर्धार

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाची राज्य सरकारने दखल घेत, या प्रक्रियेला 25 मेपर्यंत मुदतवाढ दिल्याचे परिपत्रक मंगळवारी जारी केले. मात्र त्यानंतरही प्रवेश निश्चित होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.

याबाबत सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांत दाखल याचिकांचा विचार करता त्यावरील अंतिम निर्णयानुसार प्रवेशाच्या वेळापत्रकात फेरबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध होऊ शकते, असेही प्रवेश नियामक प्राधिकरणाने मंगळवारी जारी केलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे. राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार 13 मेपासून पुढील 7 दिवस प्रवेश प्रक्रिया स्थगित ठेवण्यात येईल.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply