खासदार अमोल कोल्हे नथुराम गोडसेच्या भूमिकेत ! नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे यांच्या भूमिकेतून घराघरात आणि जनतेच्या मनात पोहोचलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आपल्या अजून एका भूमिकेमुळे चर्चेत आले आहेत. यानंतर आता ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात नथुराम गोडसे यांची भूमिका करणारे राष्ट्रवादीचे खा. अमोल कोल्हे नव्या वादात सापडले आहेत.

या त्यांचा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर ३० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. राष्ट्रवादी पक्षाचे खासदार असताना गांधींची हत्या करणाऱ्या गोडसे यांचे समर्थन करणारी भूमिका तुम्ही कशी करू शकता, असा सवाल त्यांना विचारला जाऊ लागला आहे. नथुराम गोडसेची भूमिका कोल्हे यांनी साकारल्याने आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या संदर्भात त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.

याबद्दल माध्यमांशीबोलताना कोल्हे म्हणाले, मी २०१४ ते २०१६ या कालावधीत शिवसेनेमध्ये सक्रिय होतो. नंतर तेथूनही मी दूर झालो. २०१९ मध्ये मी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. मधल्या काळात म्हणजे २०१७ मध्ये मी हा सिनेमा केला होता. तो सिनेमा प्रदर्शित होणार की नाही, असा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून होता. अचानक तो चित्रपट प्रदर्शित होत असल्याचे मला कळाले.

मी आजपर्यंत कधीही गांधी हत्येचे समर्थन केलेले नाही, तसेच नथुराम गोडसे यांचे उदात्तीकरणही मी कधी केले नाही. मात्र, एखाद्या चित्रपटात एखादी भूमिका करायला मिळणे याचा अर्थ आपण तसे आहोत, असा होत नाही. तसेच राजकीय भूमिका घेणे हा प्रत्येकाचा स्वतंत्र विषय आहे. माझ्या पक्षातल्या लोकांना याला विरोध केला तर वैशम्य वाटण्याचे कारण नाही. कारण ही राजकीय भूमिका आहे. माझ्या पक्षश्रेष्ठींना हे मी कळवलेले आहे, असे कोल्हे यांनी म्हटले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा