सांगलीत बंद पाळणे यामागे राजकीय षडयंत्र – सुप्रिया सुळे

खासदार संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज सांगली जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.  संभाजी भिडे यांनी सांगली बंदचे आवाहन केले आहे.

“संजय राऊत यांनी केलेल्या विधानाच्या निषेधार्थ आज सांगली बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे दुर्दैव म्हणावं लागेल. ज्या छत्रपतींनी आपल्याला कष्ट करायला शिकवलं आणि त्याच्यासाठी बंद करणे. हे जरा चुकीचे वाटत. यात काहीतरी राजकीय षडयंत्र दिसत आहे,” असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली येथे जात असून त्याच दिवशी बंदची हाक देणं योग्य नसल्याचेही सुळे यांनी सांगितले.

“संजय राऊत यांनी काल त्यांचे शब्द मागे घेतले आहे. त्यामुळे ती चर्चा न करता राज्यात आज अनेक गंभीर प्रश्न असून त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे,” असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांनी आपण छत्रपतींचे वासर असल्याचे पुरावे द्यावेत, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. संजय राऊतांनी उदयनराजे यांच्याबद्दल वक्तव्य करुन देशाचा अपमान केला. हा अपमान छत्रपती परंपरेचा अपमान आहे, असे आम्ही मानतो. याचा निषेध म्हणून  सांगली बंद राहील, असे संभाजी भिडे यांनी म्हटले होते.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.