InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

खासदार वीरेंद्र कुमार १७ व्या लोकसभेचे ‘हंगामी अध्यक्ष’

१७ व्या लोकसभेसाठी भाजपा खासदार वीरेंद्र कुमार खटिक यांना मंगळवारी ‘हंगामी अध्यक्ष’ म्हणुन नियुक्त करण्यात आले आहे. वीरेंद्र कुमार हे मध्यप्रदेशमधील टीकमगढचे खासदार आहेत. आता ते सर्व खासदारांना शपथ देतील.

या अगोदर लोकसभा हंगामी अध्यक्ष पदासाठी बरेलीचे खासदार संतोष गंगवार व सुल्तानपुरच्या खासदार मेनका गांधी यांची नाव समोर आली होती, मात्र भाजपा नेतृत्वाने ही दोन्हा नाव डावलत वीरेंद्र कुमार खटिक यांना संधी दिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.