#MPSC | विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू
#MPSC | पुणे : एमपीएस विद्यार्थ्यांच्या आंदोलन विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरु होते. एमपीएसचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी होती. यासंदर्भात दोन महिन्यांपासून वारंवार विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश
विद्यार्थ्यांची मागणी मान्य केल्याची माहिती मंडळाने ट्विट करत दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी महिन्याभरापूर्वी आश्वासन देऊनही एमपीएससीची परीक्षा पद्धती बदलली नव्हती. त्यामुळे पुण्यातल्या परीक्षार्थींना पुन्हा गेल्या दोन दिवसांपासून आंदोलन सुरु केले होते.
नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू
एमपीएससीने एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी, आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा निर्माण झालेला प्रश्न लक्षात घेऊन नवा अभ्यासक्रम 2025 सालापासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सुधारित परीक्षा योजना तसेच नवा अभ्यासक्रम 2025 सालापासून लागू करण्यात येईल असे एमपीएससीने सांगितले आहे. त्यामुळे एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे.
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) February 23, 2023
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेतून लाईव्ह https://t.co/uDpzjBwvPC
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 23, 2023
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील या निर्णयानंतर समाधान व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे आभार मानले आहेत. “विद्यार्थ्यांची जी मागणी होती त्या प्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निर्णय घेतला आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आम्हाला या प्रकरणात राजकीय श्रेय घ्यायचे नव्हते. मात्र काही लोक विद्यार्थ्यांच्या आडून त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत होते,” असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
राज्य सरकारच्या विनंतीला मान देत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आता नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू होईल, अशा स्वरूपाचा निर्णय अधिकृतपणे जाहीर केला असून या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. एमपीएससीने विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार. #MPSC https://t.co/JisKHRXbXI
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 23, 2023
महत्वाच्या बातम्या-
- Devendra Fadnavis | “संजय राऊत दुर्दैवाने एका पक्षाचे…”; देवेंद्र फडणवीसांची जहरी टीका
- Shivsena | उद्धव ठाकरेंनी राजीनामा नव्हता द्यायचा?; ठाकरेंच्या याच चुकीबाबत सरन्यायाधीशांचं मोठं वक्तव्य
- Abhijeet Bichukale | “मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सुनेला म्हणजेच माझ्या पत्नीला मुख्यमंत्री करा, मग बघा…”
- Supriya Sule | भावी मुख्यमंत्री कोण? ‘त्या’ बॅनरवरुन सुप्रिया सुळे आक्रमक; केली कारवाईची मागणी
- Sanjay Raut | “फडणवीस 40 खोक्यांखाली चिरडून काम करतायेत”; संजय राऊतांची बोचरी टीका
Comments are closed.