MPSC Recruitment | खुशखबर! एमपीएससीमार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
MPSC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी (MPSC) ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर! एमपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना राज्य सरकार मोठी संधी उपलब्ध करून देत आहे. यामध्ये एमपीएससी यांच्यामार्फत राज्य सरकारच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागातील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांबद्दल पदानुसार पात्रधारक उमेदवार अधिक माहिती मिळवण्यासाठी mpsc.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत राज्य सरकारच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागातील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 144 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. यामध्ये उप अभियंता (यांत्रिकी), सह संचालक, वरिष्ठ भूवैज्ञानिक, सहायक भूवैज्ञानिक आणि कनिष्ठ भूवैज्ञानिक इत्यादी पदांच्या रिक्त जागा आहेत.
शैक्षणिक पात्रता
एमपीएससीमार्फत राबविण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेसाठी पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. तरी, पदांसार इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी mpsc.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
महत्त्वाच्या तारखा
एमपीएससीमार्फत सुरू झालेल्या भरती प्रक्रियेसाठी पदानुसार इच्छुक उमेदवार 21 डिसेंबर 2022 पासून ते 10 जानेवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. एमपीएससीमार्फत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार mpsc.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
महत्वाच्या बातम्या
- Kapil Dev | कपिल देव यांनी खेळाडूंवर केली वादग्रस्त टीपणी, म्हणाले…
- Coronavirus | जगात अनेक ठिकाणी पुन्हा कोरोनाचा कहर, तर भारतात ‘ही’ स्थिती
- PAK vs ENG | पाकिस्तान संघामध्ये मोठं चक्रीवादळ येण्याची शक्यता, ‘या’ खेळाडूंवर होऊ शकतात परिणाम
- Maharashtra Weather Update | राज्यात थंडीत वाढ, तर तापमानात घट
- Uddhav Thackeray | “आमचा मोर्चा हा देवेंद्र फडणवीस साईज होता”; उद्धव ठाकरेंचा पलटवार
Comments are closed.