MPSC Recruitment | MPSC मेगा भरती! लोकसेवा आयोगामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

MPSC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत मेगा भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एमपीएससीच्या या भरती प्रक्रियेद्वारे सरकार रोजगार संधी उपलब्ध करून देत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत राज्य सरकारच्या विविध आस्थापनेवरील गट ब आणि क संवर्गातील विविध पदांच्या एकूण 8169 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पदानुसार पात्रताधारक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतील.

एमपीएससी यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये तब्बल 8169 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये सहायक कक्ष अधिकारी पदांच्या ७८ जागा, राज्य कर निरीक्षक पदांच्या १५९ जागा, पोलीस उप निरीक्षक पदांच्या ३७४ जागा, दुय्यम निबंधक (मुद्रांक निरीक्षक) पदांच्या ४९ जागा, दुय्यम निरीक्षक (राज्य उत्पादन शुल्क) पदांच्या ६ जागा, तांत्रिक सहायक पदाची १ जागा, कर सहायक पदांच्या ४६८ जागा आणि लिपिक-टंकलेखक ७०३४ इत्यादी पदांच्या जागा आहेत.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या या भरती प्रक्रियेसाठी पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी पदानुसार शैक्षणिक पात्रतेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी mpsc.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

एमपीएससीच्या या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार 25 जानेवारी 2022 पासून ते 14 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार mpsc.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.