“मुख्यमंत्री महोदय तुम्ही फक्त पाठीशी उभं रहा बाकी मी बघतो”

औरंगाबाद : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी आज पुष्पचक्र अर्पण करुन मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्मांना अभिवादन केलं. मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि रावसाहेब दानवे एकाच व्यासपिठावर होते. यानंतर उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी आणि दानवेंनी जोरदार फटकेबाजी केल्याचं पहायला मिळालं.

“रावसाहेब दानवेंना शब्द देतो, तुम्ही मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी पुढाकार घ्या, आम्ही खंबीर पाठीशी राहतो” असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं. मुख्यमंत्री महोदय पाठीशी उभे रहा, पुढचं मी बघतो, असं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले होते. “मराठवाड्यात आपण आपआपसात भांडत कशाला बसायचं? नालायकपणे कारभार करुन आपणही भांडत राहिलो तर फरक काय राहिला.

तसेच अपेक्षेशिवाय आयुष्य असू शकत नाही, तुम्ही आमच्याकडे आणि आम्ही तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करायच्या” असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रावसाहेब दानवे यांच्यात जबरदस्त शाब्दिक युद्ध यावेळी पहायला मिळालं. मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनचा प्रस्ताव राज्य सरकारने आम्हाला पाठवावा आम्ही तात्काळ दखल घेणार आहोत, असं दानवे आपल्या भाषणात म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा