‘सारेगमप’ शोमधील परीक्षकांना ट्रोल करणाऱ्यांवर भडकली मृण्मयी देशपांडे; ट्रोलर्सला दिले जबरदस्त उत्तर

मुंबई : सर्वांचा लोकप्रिय शो ‘सा रे ग म प लिटील चॅम्प्स’ सरू होऊन काहीच आठवडे उलटले आहेत. कार्यक्रम सुरू होऊन तीनच आठवडे उलटले असले तरीही अनेकांकडून या शोला ट्रोल केलं जात आहे. परिक्षकांच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावर शोची सूत्रसंचालक मृण्मयी देशपांडेने आपलं मत व्यक्त केलं आहे.

मुण्मयी म्हणाली, “जर या ट्रोलर्सच्या प्रोफाइल पाहिल्या तर त्यांना 5 ते 7 फॉलोवर्स असतात. त्यांनी एकही पोस्ट टाकलेली नसते. सध्या ट्रोलिंग हा बिझनेस झाला आहे. अनेक अशा एजन्सीज आहेत, ज्यांच्याशी संपर्क साधून लक्ष देऊन एखाद्या शोला ट्रोल करता येतं. मला तर खरच वाटतं की हे आधीच टपून बसलेले होते, कधी आम्ही येतो आणि ट्रोल करायला सुरूवात करतो.”

पुढे ती म्हणाली, “जर हे खरचं ट्रोलिंग असतं तर ते १ ते २ आठवड्यांनंतर सुरू झालं असतं. त्यामुळे आम्ही ट्रोलिंग जास्त मनावर घेत नाही. १२ वर्षांपूर्वी ही मुलं (परिक्षक) लहान होती. आता ती मोठी आहेत, त्यामुळे पोटशूळपणाही असतोच. मला वाटतं, माणूस मोठा होतो हे प्रेक्षक कुठेतरी विसरत चालला आहे. तुम्ही त्या पंचरत्नावंर प्रेम केलं म्हणून ते त्याचं फ्रेममध्ये अडकून राहणार आहेत का? असा सवालही तिने प्रेक्षकांना केला.” अस म्हणत मृण्मयीने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा