MS Dhoni | … म्हणून महेंद्र सिंग धोनीने उच्च न्यायालयात घेतली धाव

MS Dhoni | मुंबई : एका आय़पीएस अधिकाऱ्याच्या विरोधात भारताचा माजी क्रिकेटपटू महेंद्र सिंग धोनी (MS Dhoni) याने मद्रास उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. धोनीने 2014 मध्ये तत्कालीन पोलीस महानिरीक्षक (IG) संपत कुमार (Sampat Kumar) यांना मॅच फिक्सिंग आणि स्पॉट-फिक्सिंग प्रकरणी धोनीशी संबंधित कोणतेही वक्तव्य करण्यापासून रोखण्यासाठी दिवाणी खटला दाखल केला होता. 100 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याचे निर्देश देण्याची विनंतीही त्याने न्यायालयाला केली होती.

न्यायालयाने 18 मार्च 2014 रोजी संपत कुमारला धोनीविरोधात कोणतेही वक्तव्य करण्यापासून रोखत अंतरिम आदेश दिला. तरीही संपत कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून न्यायपालिका आणि त्यांच्या विरोधात राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वरिष्ठ वकिलाविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केली आहे.

२०१३ च्या आयपीएल स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीच्या घोटाळ्यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ माजली होती. या प्रकरणी भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखालील संघ चेन्नई सुपर किंग्जही अडचणीत सापडला होता. या संघाचे काही अधिकारी सट्टेबाजीच्या प्रकरणी दोषी आढळले होते. याच प्रकरणाविषयी विधानं केल्यामुळे धोनीने एका आयपीएस अधिकाऱ्याला कोर्टात खेचलं आहे.

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.