MS Dhoni | राहुल द्रविडची सुट्टी तर धोनी होणार टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक?

MS Dhoni | टीम महाराष्ट्र देशा: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यामध्ये भारतीय संघाला 209 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे यानंतर भारतीय क्रिकेट संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर टीम इंडियाचा प्रशिक्षक बदलणार असल्याच्या चर्चा देखील सुरू आहे.

Rahul Dravid may be removed as head coach

मीडिया रिपोर्टनुसार, राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना मुख्य प्रशिक्षक पदावरून हटवले जाऊ शकते. राहुल द्रविड यांच्या जागी महेंद्रसिंग धोनीची (MS Dhoni) प्रशिक्षक पदी नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण राहुल यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाला ICC स्पर्धेत 03 वेळा पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे टीम इंडियाचा प्रशिक्षक बदलला जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने (MS Dhoni) 03 आयसीसी स्पर्धा खेळल्या आहे. तीनही स्पर्धेमध्ये भारतीय संघाला अपयश आले आहे. यामध्ये आशिया कप 2022, टी-20 वर्ल्ड कप 2023 आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल 2023 या स्पर्धांचा समावेश आहे. तीन वेळा पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे राहुल द्रविड यांच्या पदावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

दरम्यान, महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. महेंद्रसिंग धोनी जेव्हा कर्णधार होता, तेव्हा भारतीय संघाने 03 आयसीसी स्पर्धा जिंकल्या होत्या. त्यामुळं राहुल द्रविडच्या जागी महेंद्रसिंग धोनीची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती होऊ शकते.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://maharashtradesha.com/ms-dhoni-is-likely-to-replace-rahul-dravid-as-the-new-coach-of-team-india/?feed_id=45623