Mukta Tilak | भाजपा आमदार मुक्ता टिळक यांचं निधन

Mukta Tilak | पुणे : पुणे येथील कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे दीर्घ आजाराने पुण्यात निधन झाले. त्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होती. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाग घेण्यासाठी त्या व्हीलचेअरवर बसून मतदान करण्यासाठी निवडणुकीच्या ठिकाणी पोहोचल्या होत्या. तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीबाबत सातत्याने चर्चा होत होती.

पुणे शहरातील कसबा पेठ मतदारसंघातील ५६ वर्षीय आमदार प्रथम राज्यसभा आणि नंतर विधानपरिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी मुंबईला गेल्या होत्या. त्या बऱ्याच दिवसांपासून कॅन्सरशी झुंज देत असल्याचं सांगण्यात येत आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे म्हणाले, भाजपा आमदार मुक्ताताई टिळक यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतीव दुःख झाले. त्यांच्या अकाली निधनाने राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. भाजपा, महाराष्ट्रतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले, मुक्ताताई टिळक यांनी कर्करोगाशी लढा देत असतानाही दाखवलेली पक्षनिष्ठा सदैव स्मरणात राहील. आमदार, महापौर अशी विविध पदं त्यांनी भूषवली, पण पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्या अशीच त्यांची खरी ओळख राहील. माझ्या भगिनी, सहकारी मुक्ताताईंना आदरांजली.

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed.