InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

हिमालय पादचारी पूलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटर नीरजकुमार देसाईला अटक

छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाजवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जण मृत्युमुखी पडले, तर ३१ जण जखमी झाले होते. या दुर्घटनेप्रकरणी चुकीचा स्ट्रक्चरल अहवाल दिल्याचा ठपका असलेले स्ट्रक्चरल ऑडिटर नीरजकुमार देसाई काल अटक करण्यात आली आहे. सदोष मनुष्यवधाप्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

याआधी पूल दुर्घटनेप्रकरणी मुख्य अभियंता एस. ओ. कोरी, ए. आर. पाटील, उपमुख्य अभियंता आर.बी.तारे आणि सहाय्यक अभियंता एसएफ काकुळते यांचे निलंबन करण्यात आले आहे. याप्रकरणी 22 मार्चला मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply