InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

सुरक्षेच्या कारणावरुन मुंबईच्या डबेवाल्यांना शाळांमध्ये प्रवेशबंदी

मुंबईतील शाळांमध्ये डबेवाल्यांना विद्यार्थ्यांसाठी मधल्या सुट्टीत डबे आणण्यास मनाई करण्यात आली आहे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलले असल्याचे शाळांकडून कारण सांगण्यात येत आहे.

ही बंदी अयोग्य असल्याचे मुंबई भाजपध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटले असून, मुख्यमंत्र्यांचे याकडे लक्ष वेधले आहे. तसेच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही तातडीने लक्ष घालण्यााचे निर्देश शिक्षण उपसंचालकांना दिले आहे.

आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना आज प्रत्यक्ष भेटून तसेच पत्र लिहून ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. दरम्यान, मुंबई पोलीस आयुक्तांनी तातडीने शाळा, डबेवाले यांच्याशी संयुक्त बैठक घेऊन यावर तोडगा काढावा असे निर्देश या पत्रावर मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply