InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

महिलांच्या डब्ब्यात हस्तमैथुन करणाऱ्याला विद्या बालनने घडवली अद्दल

विद्याने सांगितली 'आप बीती'

वेब टीम :मुंबईत सीएसटी रेल्वे स्थानकावर एक तरुण युवतीकडे पाहून हस्तमैथुन करत असल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला होता. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन हिनेही तिच्यासोबत घडलेला एक प्रसंग आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. अभिनेत्री नेहा धुपियाच्या ‘नो फिल्टर नेहा’ या शोमध्ये तिने सेंट झेवियर्स महाविद्यालयात शिकत असताना रेल्वे प्रवास करतेवेळी घडलेला प्रसंग विद्याने सांगितला.
विद्याने सांगितलेली आप बीती
आम्ही तीन मैत्रिणी लोकलमध्ये महिलांच्या डब्यात बसलो होतो. त्यावेळी एक मुलगा आमच्या डब्यात चढला. तो आमच्या समोरच येऊन बसला. हा लेडीज डबा असल्याचं त्याला सांगितलं. तेंव्हा पुढच्या स्टेशनला मी उतरून जातो’, असं सांगून तो दरवाजात जाऊन उभा राहिला. त्यानंतर पुढचं स्टेशन आलं पण तो उतरला नव्हता. ट्रेन सुरू झाल्यानंतर तो पुन्हा खिडकीजवळ येऊन बसला.त्याने अचानक पँटची जीप काढली आणि आमच्या समोरच हस्तमैथुन करायला सुरुवात केली. माझ्या हातात पेपर पॅड किंवा फाइल सारखं काही तरी होतं . त्यानेच मी त्याला मारायला सुरुवात केली, असं विद्याने सांगितलं.
त्याला खेचतच गेटपर्यंत घेऊन गेले आणि त्याला मी खरोखरच ट्रेनमधून ढकलून दिलं. नशीब तेवढ्यात स्टेशन आलं होतं. म्हणून तो वाचला. नाही तर त्याच दिवशी तो मेला असता, असंही तिनं सांगितलं. ‘तुम्हारी सुलू’ हा विद्याचा नवा चित्रपट येत आहे. त्यात तिने रेडिओ जॉकीची व्यक्तिरेखा साकारली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने नेहा धुपियाच्या शोमध्ये आली असता तिने हा प्रसंग सांगितला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply