InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मुंबई मॅरेथॉनचा उत्सव पाहूनच फिटनेस- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई मॅरेथॉनचे वातावरण व त्याच्या उत्सवाचे स्वरूप पाहूनच आपणास आपोआप फिटनेस येतो, असे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे माध्यमाशी बोलताना काढले. त्यांच्या हस्ते मुंबई मॅरेथॉनच्या ‘ड्रीम रन’ ला ‘फ्लॅग ऑफ’ ने सुरुवात झाली.

यावेळी मुख्यमंत्री महोदयांच्या पत्नी अमृता फडणवीस, क्रीडा व युवक कल्याण मंत्री विनोद तावडे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, आमदार आशिष शेलार, आमदार राज पुरोहित, मुंबईचे पोलीस आयुक्त सुबोध कुमार जयस्वाल, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, ज्याप्रमाणे जनता आपल्या आशा-आकांक्षा व अपेक्षा घेऊन खुल्या आसमानाखाली ज्या उत्साहाने येतात तो उत्साह येथील वातावरणाने कायम टिकून राहतो. उत्साही व आनंदी राहणे या दोन गोष्टी आपल्याला सदैव फिट ठेवू शकतात. रोज सकाळी थोडा वेळ व्यायाम जरी केला तरी आपण फिट राहू शकतो.

या मॅरेथॉनमध्ये अव्वल धावपटूंसह बॉलिवूड कलाकार, दिग्गज खेळाडू, उद्योजक, ॲथलेटीक्स, नागरीक, वृद्ध, दिव्यांग, युवा यांचा सहभाग होता.

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.