“तुझ्या बापाला,” नेटकऱ्याचा बाप काढल्याने मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर वादात

मुंबई : एका नेटकऱ्याचा बाप काढणं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना चांगलंच महागात पडलं आहे. यामुळे त्या सध्या वादात अडकल्यात. त्यांच्यावर विरोधकांकडूनही जोरदार टीका करत आहेत. नेटकऱ्याने लसीसंदर्भात पालिकेने काढलेल्या ग्लोबल टेंडरसंबंधी प्रश्न विचारला असता किशोरी पेडणेकर यांनी आक्षेपार्ह शब्दात उत्तर दिलं.

किशोरी पेडणेकर यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. ही मुलाखत त्यांनी आपल्या ट्विटरला शेअर केली होती. या मुलाखतीत त्यांनी एक कोटी लोकांना लस देण्यासंदर्भात पालिकेकडून काढण्यात आलेल्या ग्लोबल टेंडर तसंच त्याला कंपन्यांनी दिलेल्या प्रतिसादाचा उल्लेख केला होता.

या ट्विटवर एका व्यक्तीने कंत्राट कोणाला दिले? असा प्रश्न विचारला होता. यावर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर देताना ‘तुझ्या बापाला’ असं म्हटलं. हे ट्विट व्हायरल होऊ लागल्यानंतर महापौरांवर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली. सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागल्यानंतर महापौरांनी अखेर हे ट्विट डिलीट केलं.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा