InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मध्यम, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लाॅक

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्ग आणि हार्बरसह आज एकूण चार ब्लॉक घेण्यात येणार आहेत.  मुलुंड ते माटुंगा दरम्यान डाऊन धिम्या मार्गावर नियमित कामांसाठी सकाळी ११.३० पासून चार तासांचा आणि हार्बरवर कुर्ला ते वाशी दोन्ही मार्गावर ब्लॉक असणार आहे.

याशिवाय कर्जत स्थानकातील कामांत एका झाडाचा अडथळा ठरत असल्याने ते पाडण्याच्या कामासाठीही तीन तासांचा, आसनगाव ते कसारा स्थानकादरम्यानही पुलावर गर्डर बसवण्यासाठीही दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर लोकल गाडय़ा उशिराने धावतील. हार्बरवर कुर्ला ते वाशी आणि पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगावदरम्यानही ब्लॉक असेल.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply