InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मुंबईत महानगर पालिका, बिल्डरांचा पार्किंग घोटाळा?

मुंबईकरांना अधिकाधिक पार्किंग उपलब्ध व्हावे यासाठी महापालिकेने बिल्डरांना अतिरिक्त चार एफएसआय देऊन ९३ वाहनतळांवर ५५ हजार ७४२ गाड्या पार्क होतील, असे नियोजन केले. मात्र प्रत्यक्षात आत्तापर्यंत ९३ पैकी फक्त २६ वाहनतळ पालिकेच्या ताब्यात आले असून त्यात २१,७७८ गाड्या पार्क होतील इतकी जागा मिळाली आहे.

मात्र प्रत्यक्षात १४ वाहनतळच सुरू झाले असून त्यावर ८,५२६ गाड्या पार्क होऊ शकतात. पालिकेतील विरोधी पक्षांनी फक्त चार हजार गाड्यांसाठीच पार्किंग मिळाले असल्याचा दावा केला असून काही बिल्डरांनी वाहनतळ पालिकेच्या ताब्यात न देता दहा हजार कोटींचा एफएसआय हडपल्याचा आरोप केला आहे. तर, ज्यांनी वाहनतळ हस्तांतरण केले त्यांनाच एफएसआयचा लाभ दिल्याचा दावा पालिकेने केला आहे. पालिकेच्या वाहनतळापासून ५०० मीटरच्या अंतरावर अवैध पार्किंग केल्यास दहा हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यास पालिकेने सुरुवात केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply