InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

उर्मिला मातोंडकरच्या नावावर किती संपत्ती आहे ?

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकरने आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी प्रतिज्ञापत्रात उर्मिलाने आपली संपत्ती, शिक्षण, गुन्हेविषयक माहिती जाहीर केली आहे.

उर्मिला मातोंडकरच्या नावे 41 कोटींची जंगम मालमत्ता असून, यामध्ये शेअर्स, बाँड, म्युचुअल फंड (28.28 कोटी) यांचा समावेश आहे. उर्मिलाकडे एक मर्सिडीज कारही आहे.

उर्मिलाकडे वांद्रे परिसरात चार फ्लॅट्स आहेत . सध्याच्या बाजारभावानुसार या फ्लॅट्सची किंमत 27.34 कोटी रुपये होते. तसेच वसईमध्ये उर्मिलाच्या नावावर दहा एकर जमीन असून, त्याची किंमत एक कोटी 68 लाख रुपयांच्या आसपास आहे.उर्मिलाचे शिक्षण डी. जी. रुपारेल महाविद्यालयात झाले असून, तिने द्वितीय वर्षानंतर (SYBA) तिने शिक्षण सोडून दिलं. तसेच तिच्या विरोधात कोणताही गुन्हा नोंद नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.