Mumbai Police | मुंबईत लवकरच बॉम्बस्फोट होणार; मुंबई पोलिसांना ट्विटरवर धमकीचा मेसेज

Mumbai Police | मुंबई: महाराष्ट्रामध्ये बॉम्बस्फोट धमकीचे प्रकरणं सातत्याने समोर येत आहे. त्याचबरोबर मुंबई शहर पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या टार्गेटवर आहे. मुंबईला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलला टॅग करत ही धमकी देण्यात आली आहे. 22 मे रोजी सकाळी 11 च्या सुमारास ही पोस्ट करण्यात आली आहे.

Threatening message to Mumbai Police on Twitter

“मी लवकरच मुंबई स्पोट करणार आहे”, असं ट्विट करत मुंबई पोलिसांना (Mumbai Police) धमकी देण्यात आली आहे. हे ट्विट एका अनोळखी तरुणाने केलं आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे. ज्या ट्विटर हँडलवरून ही पोस्ट करण्यात आली होती त्याचीही चौकशी करण्यात आली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रामध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमक्या अनेक वेळा मिळत असतात. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फोनकॉलवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3BSUpE9