येत्या 24 तासांमध्ये मुंबई पोलिसांनी माझी माफी मागावी : किरीट सोमय्या

मुंबई : भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप केले आहे. याच संदर्भात सोमय्या हे मुश्रीफांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी कोल्हापुरला जाणार होते, मात्र, पोलिसांनी त्यांना अडविले. या पार्श्वभूमीवर त्यांनी कोल्हापूर दौऱ्यात अडथळा आणल्याने मुंबईत पोलिसांविरोधातच तक्रार केली आहे. अशा प्रकारे उद्धव ठाकरे आणि शरद पवार लोकशाही चालवणार आहेत का? असा सवालही त्यांनी विचारला.

किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्यावरून रविवारी मुंबईपासून कोल्हापूरपर्यंत राजकीय नाट्य घडले होते. किरीट सोमय्या यांचा कोल्हापूर दौरा रोखून त्यांना ताब्यात घेतल्यामुळे त्यांनी आता पोलिसांविरोधात तक्रार दाखल केली आहे. येत्या 24 तासांत मुंबई पोलिसांनी माफी मागावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

सोमय्या म्हणाले की, “कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी असताना मला घरात कोंडून ठेवले. पोलिसांना कायदेशीर नोटीस दिल्यानंतरही सीएसटी बाहेर मी जाऊ नये यासाठी, ठाकरे सरकारच्या पोलिसांनी गुंडगिरी केली. त्यामुळे सोमय्या त्यांच्याविरोधात तक्रार करण्यासाठी पोलिसात गेले. तसेच आज कोल्हापूर जिल्हाधिकारी आणि एसपींना पुन्हा पत्र लिहिले आहे. पुन्हा मंगळवार आणि बुधवारी कोल्हापूर दौऱ्यासाठी जाणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या