InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

करिनाचे इन्कम टॅक्स डिटेल्स हॅक करण्याचा प्रयत्न करणा-याला अटक

- Advertisement -

मुंबई: अभिनेत्री करिना कपूरच्या इन्कम टॅक्स ई-फायलिंगचं अकाऊण्ट हॅक करण्याचा प्रयत्न करणा-या एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. करिना यांच्या सीएच्या तक्रारीनंतर मुंबई सायबर सेल विभागाने एका व्यक्तीला अटक केली आहे. २०१६ तील करिनाच्या इन्कम टॅक्स अकाउंटचे डिटेल्स मिळवण्याचा प्रयत्न हा व्यक्ती करत होता. दोन महिन्यांपूर्वीच ही तक्रार दाखल करण्यात आली होती.
करिना स्वतःच आयकर विवरणपत्र भरत असल्याचं हॅकरने भासवलं होतं. संबंधिताने करिनाचं उत्पन्न कमी असल्याचं दाखवणारं बनावट विवरणपत्र तयार करुन आयकर विभागाला ई-फायलिंग केलं होतं. सायबर विभागाने गुन्हा नोंदवून तपास केला असता महाराष्ट्राबाहेरुन ही अॅक्टिव्हिटी झाल्याचं समोर आलं. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी हा केंद्रीय निमलष्कर बलाचा कर्मचारी असून तो इतरांचेही ई-फायलिंग करत असल्याची माहिती आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.