मुंडे म्हणतात आम्ही परस्पर सहमतीने संबंधांत तर मलिक म्हणतात, त्या महिलेशी मुंडेंचा विवाह झाला

राज्याच्या राजकारणात सद्या एक चर्चेचा विषय समोर आलाय. राजकीय वर्तुळात याबाबत चर्चेला उधाण आलय. राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्याची बातमी समोर आली. २००६ सालापासून धनंजय मुंडे तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते अशी तक्रार ओशिवरा पोलिस ठाण्य़ात रेणू शर्मा या महिलेने केली होती.
यानंतर या प्रकरणाबरोबर मुंडे यांनी आपण करुणा शर्मा सोबत परस्पर सहमतीने संबंधात असल्याचं सांगितलं आहे. बलात्काराचे आरोप करणारी तरूणी हा करूणा शर्मा यांची बहीण आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि ठाकरे सरकारमधील मंत्री नबाव मलिक यांनी आणखी एक प्रतिक्रिया दिली आहे.
नवाब मलिक यांनी ‘झी२४ तास’शी बोलताना सांगितलंय की, पोलीस संपूर्ण प्रकरणाची चौकशी करतील. तक्रारदार महिलेच्या बहिणीशी धनंजय मुंडे यांचा विवाह झाला असून त्यांना दोन आपत्य देखील आहे. त्यामुळे त्यांच्या घरातील नेमका काय विषय आहे हे धनंजय मुंडेंच बोलू शकतात. मात्र तक्रारदार महिलेच्या भगिनी धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहेत ही खरी गोष्ट आहे.
मात्र दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये तक्रारदार रेणू शर्मा यांच्या भगिनी ‘करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो’. असे स्पष्ट केले असून करुणा शर्मा यांच्याशी त्यांचा विवाह झाला असल्याचे मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये कुठेही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.
सगळ्या प्रकरणाची चौकशी नक्कीच होईल पण आपल्या भगिनी धनंजय मुंडेंच्या पत्नी आहेत हे तक्रारदार महिला सांगत नाहीत. हा त्यांच्या घरातील विषय आहे. सोशल माध्यमांवर अशा गोष्टी प्रसारित करण्यास न्यायलयाने मज्जाव केल्याने असे समोर येऊन आरोप करत असल्याचे मलिक म्हणाले आहेत. तर चौकशी पूर्ण झाल्यावर त्यातून काय समोर येतय हे पाहून पक्ष पुढील कारवाई करेल असे देखील मलिक म्हणाले आहेत.
दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. या प्रकरणात राज्य सरकारवर कोणताही दबाव नाही. संपूर्ण चौकशी झाल्यानंतर या प्रकरणातील सत्य बाहेर येईल, असं नबाव मलिक यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुंडेंवरील आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही, या प्रकरणात राज्य सरकारवर कोणताही दबाव नाही
- धनंजय मुंडे यांचा त्वरित राजीनामा घ्या नाहीतर, भाजपचा मुख्यमंत्र्यांना इशारा
- धनंजय मुंडेंविरोधातील बलात्काराची तक्रार पोलिसांनी नाकारली; रेणू शर्मा यांचं पोलीस आयुक्तांना पत्र