InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

औरंगाबादमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी एकही ठेकेदार मिळेना?

- Advertisement -

शिवसेना-भाजप युतीच्या राज्यात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबतची शोकांतिका समोर आली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या औरंगाबादेतील स्मारकासाठी एकही ठेकेदार पुढे येईना झाला आहे. औरंगाबाद महापालिकेने बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 48 कोटींची निविदा काढली आहे. पण ती निविदा एकाही ठेकेदाराने भरलेली नाही. किंबहुना एकही ठेकेदार त्यासाठी उत्सुक नाही.

विशेष म्हणजे ज्या औरंगाबाद महापालिकेने ही निविदा काढली आहे, त्या महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. निविदा भरण्यासाठी एकही ठेकेदार पुढे न आल्याने अखेर औरंगाबाद महापालिकेला निविदेसाठी मुदतवाढ द्यावी लागली. मात्र मुदतवाढ देऊनही ठेकेदार पुढे येईनात.

- Advertisement -

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी ठेकेदार मिळत नसल्यामुळे शहरात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.