InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

नगरपरिषद सभापती शेंडेसह कनिष्ठ अभियंता पारधी एसीबीच्या जाळ्यात

येथील नगर परिषदेचे नगररचना व नियोजन विभागाचे सभापती सचिन शेंडे व नगरपरिषदेचा कंत्राटी कनिष्ठ अभियंता शशी पारधी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. 8 हजार रुपयाच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. या प्रकारामुळे नगरपरिषदेत एकच खळबळ माजली आहे.

तक्रारदार एलआयसी एंजट असून त्यांच्या मालकीचा कुडवा येथे असलेल्या प्लाटचे अकृषक परवाना करण्याकरीता आवश्यक दस्तावेज सादर केले होते. त्या प्लाटचा स्थायी अकृषक परवाना काढून देण्याकरीता गैरअर्जदार शशी पारधी यांनी 8 हजारांची मागणी केली होती. परंतु तक्रारदाराला ती द्यायची मुळीच इच्छा नसल्याने पारधी यांच्याविरुध्द तक्रार नोंदविली. त्या तक्रारीच्या आधारे पडताळणी करण्यात आली.

तसेच 8 जुलै रोजी सापळा रचल्यानंतर नियोजन व विकास सभाती सचिन शेडे यांनी सुध्दा तक्रारदाराकडून लाचेची रक्कम प्राप्त करण्याचा प्रयत्न केल्याने दोघांविरुध्द गोंदिया शहर पोलीस ठाण्यात कलम 7 लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply