Muraji Patel | अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर मुरजी पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Muraji Patel | मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीतून अखेर भाजपने माघार घेतली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी यासंदर्भात माहिती दिली. भाजपचे उमेदवार मुरजी पटेल अर्ज मागे घेतील असं त्यांनी सांगितलं. मुरजी पटेल अपक्ष म्हणूनही लढणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. माघार घेतल्यानंतर मुरजी पटेल (Muraji Patel) यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली आहे.
या निवडणुकीत दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा (Rutuja Latke) लटके आणि भाजपचे मुरजी पटेल यांच्यात मुकाबला होणार होता. मात्र भाजपने माघार घेतल्याने आता ऋतुजा लटके यांचा मार्ग मोकळा झाला असल्याचं चित्र दिसत आहे. माघार घेतल्यांनंतर अनेक नेत्यांकडून याबाबत प्रतिक्रिया येत असतानाच मुरजी पटेल यांनीही याबाबत भाष्य केलं आहे. ऋतुजा लटके यांना शुभेच्छा देत त्यांनी सर्वांना शांततेत निवडणूक पार पाडण्याचं आवाहन केलं आहे.
पक्षाचा आदेश हा माझ्यासाठी सर्वमान्य मुरजी पटेल ( Muraji Patel )
यावेळी बोलताना त्यांनी भाजप नेत्यांचे उमेदवारी दिल्याबद्दल आभार मानले. पक्षाचा आदेश हा माझ्यासाठी सर्वमान्य आहे. पक्षाने आदेश दिल्याने मी माघार घेत असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. माझ्यावर प्रेम करणाऱ्या अंधेरीतील तमाम जनतेचा मी आभारी आहे. गेले २५ वर्षे जनतेची सेवा केली तशीच यापुढेही करत राहील असं आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिलं. “राजकारणात दोन पाऊले मागे यावं लागत. मात्र अंधेरी पूर्व भागात जे समाजसेवेचं काम केलं त्यापेक्षा जोमाने यापुढेही काम करू, आपलं प्रेम असच राहू द्या”, असंही पटेल म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Upcoming Car Launch | नवी कार घेण्याचा विचार करत असला, तर ‘या’ नवीन लाँच होणाऱ्या कारवर एकदा टाका नजर
- NCP । “भाजपला उशीरा सुचलेले शहाणपण”; भाजपच्या माघारीनंतर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया
- Diwali Cleaning Tips | दिवाळीसाठी घरातील पडदे साफ करण्यासाठी येत आहे प्रॉब्लेम? तर ‘या’ टीप्स करा फॉलो
- Sushma Andhare | “प्रकाश आंबेडकरांनी मला ओळखायला मी काय…”, सुषमा अंधारेंचा पलटवार
- Breaking News । मोठी बातमी! अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपची माघार
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.