Murji Patel | अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर मुरजी पटेलांनी केलं वक्तव्य, म्हणाले…

Murji Patel | मुंबई : अंधेरी (पूर्व) पोटनिवडणुकीवरून चांगलच राजकीय वातावरण तापलं होतं. ठाकरे गट विरूद्ध शिंदे गट आणि भाजप असं चित्र पाहायाला मिळतं होतं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) यांच्याकडून कै. रमेश लटके (Ramesh latke) यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर भाजपकडून (BJP) मुरजी पटेल (Murji Patel) यांना देण्यात आली होती. परंतू भाजप पक्षाने अचानक पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतली असल्याचं जाहीर केलं. यामुळे सगळीकडे खळबळ उडाली होती. अशातच याच पार्श्वभूमीवर मुरजी पटेल यांनी वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले मुरजी पटेल(Murji Patel)

अंधेरी पोटनिवडणुकीतून अर्ज मागे घेतल्यानंतर मी प्रत्येक मतदारांशी भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे. अर्ज मागे घेतल्यानंतर आम्ही लगेच कामाला लागलो. आमच्यासाठी पद हे महत्त्वाचं नसतं, आमच्यासाठी अंधेरीची जनता महत्त्वाची आहे, असं मुरजी पटेल यांनी म्हटलं आहे. मुरजी पटेल यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

नागरिकांना भेडसवणारी प्रत्येक समस्या महत्त्वाची आहे. म्हणून अर्ज मागे घेतल्यापासून मी कामाला लागलो आहे. प्रत्येक ठिकाणी जाऊन मतदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भेठी घेण्याचं काम सुरू केलं आहे. पक्षानं घेतलेल्या निर्णयावर तुम्ही नाराज आहात का? असं विचारलं असता मुरजी पटेल म्हणाले, मी अजिबात नाराज नाही. पक्षानं योग्य विचार करून हा निर्णय घेतला आहे. मी पक्षाबरोबर आहे. पक्षानं जो निर्णय घेतला तो मला मान्य आहे.

तसेच, मुरजी पटेल यांना पोटनिवडणुकीमध्ये तुम्हाला माघार घ्यायला लावल्यामुळे तुम्हाला विधान परिषदेवर संधी देण्याबाबत चर्चा सुरू असल्याचं विचारण्यात आले. असं काहीही नाही. मला विधान परिषदेवर संधी देण्याबाबत कुठलीही चर्चा झाली नाही. आमच्या पक्षाचं एकच धोरण आहे, काम करा… बाकीची पर्वा करून नका. निवडणुकीचा अर्ज मागे घेतल्याने नाराज झालेल्या समर्थकांची समजूत काढली आहे, ते सगळे आता जोमाने कामाला लागले आहेत. त्यामुळे मतदारांना मी एवढंच सांगू इच्छितो की, मी मागील 22 वर्षांपासून तुमची सेवा करत आहे. यापुढे यापेक्षा अधिक ताकदीने तुमची सेवा करत राहील, असं मुरजी पटेल यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.