Muscle Pain | हिवाळ्यात सांधे दुखीच्या समस्येपासून त्रस्त आहात?, तर करा ‘हे’ उपाय

टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये वाढत्या थंडीमुळे हात, पाय, कंबर आणि पाठदुखी (Muscle Pain) चा त्रास दिवसेंदिवस वाढत जातो. त्यामुळे हिवाळ्यामध्ये फक्त रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवणे महत्त्वाचे नाही, तर त्याचबरोबर स्नायूंची देखील काळजी घेतली गेली पाहिजे. नियमित व्यायाम न केल्याने किंवा एका ठिकाणी जास्त वेळ बसून राहिल्याने सांधे दुखण्याची समस्या निर्माण होऊ लागते. हिवाळ्यामध्ये ही समस्या आणखीनच वाढतात. त्यामुळे या ऋतूमध्ये शरीराची आणि आरोग्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. म्हणूनच आज या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांधेदुखीवर काही उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यावर तुमची सांधेदुखीची समस्या कमी होऊ शकतो.

हात आणि मनगट दुखल्यावर काय करावे?

हिवाळ्यामध्ये वाढत्या थंडीमुळे मनगट आणि हात दुखण्याच्या समस्या निर्माण होतात. या समस्या उद्भवल्यास उठता-बसताना आणि चालताना खांद्यांना आरामशीर स्थितीत ठेवावे. त्याचबरोबर काम करत असताना थोडा-थोडा वेळाने ब्रेक घ्यावा. ब्रेक दरम्यान हाताच्या आणि मनगटांच्या हालचाली सुरू ठेवाव्या. त्याचबरोबर तुम्ही जर लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर काम करत असाल, तर कधीही एका हाताने कीबोर्ड हाताळू नका.

पाठदुखी पासून कशी सुटका मिळवावी?

हिवाळ्यामध्ये पाठदुखीची समस्या निर्माण झाल्यास चालायला आणि बसायला खूप त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या बसण्याची पद्धत व्यवस्थित करू शकतात. या परिस्थितीमध्ये तुम्हाला जड व्यायाम करणे टाळावे लागेल. यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही नियमित योगा करू शकतात. तुम्हाला जर पाठ दुखीची समस्या त्रास देत असेल. तर तुम्ही एकाच वेळी एकाच स्थितीत जास्त वेळ बसू नका. त्याचबरोबर पाठदुखीची समस्या टाळण्यासाठी स्ट्रेचिंग करणे खूप महत्त्वाचे आहे.

गुडघेदुखीला कसे लांब पळवायचे?

हिवाळ्यामध्ये तुम्ही जर गुडघेदुखीच्या त्रासापासून त्रस्त असाल, तर तुम्हाला नियमित चालणे खूप आवश्यक आहे. त्याचबरोबर या समस्याला दूर करण्यासाठी तुम्ही काही गुडघ्याचे योगासने देखील करू शकतात. त्याचबरोबर स्नायूंना मजबूत ठेवण्यासाठी आणि गुडघ्यांवरील ताण कमी करण्यासाठी तुम्हाला नियमित स्ट्रेचिंग करावी लागेल.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.