“मुश्रीफांना तुरूंगात धाडणार, आजपासून ठाकरे सरकारच्या अंताला सुरूवात”

कोल्हापूर : भाजपचे फायर ब्रँड नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप लावले आहेत. मुश्रीफ यांनी केलेल्या १२७ कोटींच्या घोटाळ्यांचे तब्बल २७०० पानी पुरावेच आपण आयकर विभागाकडे सादर केल्याचं किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं होत. तसेच , फक्त हसन मुश्रीफच नाही, तर त्यांच्या पूर्ण कुटुंबाच्या नावे हे पुरावे असल्याचं ते म्हणाले होते.

यानंतर गेल्या काही दिवसांपूर्वी मुश्रीफ यांच्या विरोधात पुरावे घेण्यासाठी कोल्हापूरला निघाले होते. कोल्हापूर मध्ये शांतता व सुव्यवस्था राहावी म्हणून प्रशासनाने कराडमध्ये सोमय्यांना आडवून त्यांना ताब्यात घेतले. यानंतर त्यावेळी त्यांचा कोल्हापूर दौरा रद्द झाला. यानंतर आज त्यांचा हा दौरा पुन्हा सुरु झालाय. आता किरीट सोमय्या यांनी कोल्हापूरात जाऊन थेट ठाकरे सरकारविरूद्ध दंड थोपटले आहेत.

घोटाळेबाज मंत्री हसन मुश्रीम यांना तुरूंगात धाडणार. आजपासून ठाकरे सरकारच्या अंताची सुरुवात झाली आहे, असं भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले. किरीट सोमय्या यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं. यावेळी मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा होता. किरीट सोमय्या हे सकाळी 8 च्या सुमारास कराडहून कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले. त्याआधी कराडमध्ये जरंडेश्वर साखर कारखान्याचे शेतकरी, संचालकांनी सोमय्यांची भेट घेतली.

महत्वाच्या बातम्या

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा