मुश्रीफांच्या अडचणी वाढल्या; २७०० पानी पुरावे घेवून सोमय्या पोहोचले ED कार्यालयात

मुंबई : भाजपचे फायर ब्रँड नेते किरीट सोमय्या यांनी  राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप लावले आहेत. मुश्रीफ यांनी केलेल्या १२७ कोटींच्या घोटाळ्यांचे तब्बल २७०० पानी पुरावेच आपण आयकर विभागाकडे सादर केल्याचं किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं होत. तसेच , फक्त हसन मुश्रीफच नाही, तर त्यांच्या पूर्ण कुटुंबाच्या नावे हे पुरावे असल्याचं ते म्हणाले होते.

तसेच किरीट सोमय्या म्हणाले की मी राज्य सरकारमधील ११ भ्रष्टाचारी मंत्र्यांची यादी जाहीर केली होती. पण दुर्दैवाने ११ जणांच्या टीममध्ये राखीव खेळाडूंची संख्या वाढायला लागली आहे. हसन मुश्रीफ यांचं नाव राखीव खेळाडूंमध्ये आम्ही वाढवत आहोत. हसन मुश्रीफ परिवाराने शेकडो कोटींचे घोटाळे केले आहेत. असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

यानंतर आता या सगळ्या पार्शभूमीवर २७०० पानी पुरावे घेऊन ईडीच्या कार्यालयात पोहोचले आहे. सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखानामध्ये कोट्यवधी रुपयांची बेनामी शेअर कॅपिटल भ्रष्टाचार झालेचे पुरावे घेऊन माजी खासदार किरीट सोमय्या ठरल्याप्रमाणे आज दुपारी ईडीच्या कार्यालयात पोहोचले. ईडीमधील ४ अधिकाऱ्यांसोबत सविस्तर बैठक झाली. कागदोपत्री पुरावे दिले आहेत, अशी माहिती सोमय्यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा