बॉलिवूडचे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक मोहम्मद जहूर खय्याम यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक मोहम्मद जहूर खय्याम यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले आहे. मागील अनेक दिवसांपासून ते फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होते. प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने जुहूच्या सुजॉय रूग्णालयात हलवण्यात आले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. 1953 ते 1990 या कालावधीत त्यांनी अनेक चित्रपटांना संगीत दिले होते.

1947 मध्ये त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. 1958 साली प्रदर्शित झालेल्या ‘फिर सुबह होगी’ हा त्यांचा चित्रपट चांगलाच गाजला. याच चित्रपटाने त्यांना खरी ओळख मिळवून दिली. खय्याम यांनी संगीतबद्ध केलेली या चित्रपटातील गाणी कमालीची लोकप्रिय झाली होती. कभी कभी, उमराव जान, फिर सुबह होगी अशा सुपरडुपर हिट चित्रपटांना त्यांना संगीत दिले. कभी कभी व उमराव जान या दोन चित्रपटांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

महत्वाच्या बातम्या-

Loading...
महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.