Muskmelon Juice | उन्हाळ्यामध्ये खरबूजचा रस प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Muskmelon Juice | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये खरबूज बाजारामध्ये सहज उपलब्ध असते. खरबूज आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. उन्हाळ्यामध्ये शरीराला थंड ठेवण्यासाठी खरबुजाचे सेवन करणे उपयुक्त ठरू शकते. खरबुजामध्ये विटामिन सी, विटामिन के, फायबर, फॉलेट, कॉपर, मॅग्नेशियम, पोटॅशियम इत्यादी पोषक घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात, जे आरोग्याची काळजी घेण्यास मदत करतात. त्याचबरोबर खरबुजामध्ये 90% पाणी आढळून येते, जे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. उन्हाळ्यामध्ये खरबुजाचा रस प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. खरबुजाच्या रसाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि अनेक गंभीर आजारांपासून बचाव होतो. त्याचबरोबर खरबुजाचा रस प्यायल्याने आरोग्याला खालील फायदे मिळतात.

शरीर हायड्रेट राहते (The body stays hydrated-Muskmelon Juice Benefits)

उन्हाळ्यामध्ये अनेकदा शरीरात पाण्याची कमतरता भासते आणि डीहायड्रेशनची समस्या निर्माण होते. डीहायडरेशनच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही खरबुजाच्या रसाचे सेवन करू शकतात. खरबुजामध्ये भरपूर प्रमाणात पाणी आढळून येते, जे शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करते. खरबुजाचा ज्यूस प्यायल्याने या गरम वातावरणात शरीर थंड राहू शकते.

रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते (Immunity is strengthened-Muskmelon Juice Benefits)

निरोगी राहण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी तुम्ही खरबुजाच्या रसाचे सेवन करू शकतात. खरबुजामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आणि अँटीऑक्सीडेंट गुणधर्म आढळून येतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. खरबुजाच्या रसाचे नियमित सेवन केल्याने तुम्ही सर्दी-खोकला इत्यादी मोसमी आजारांपासून दूर राहू शकतात.

वजन नियंत्रणात राहते (Weight remains under control-Muskmelon Juice Benefits)

या उन्हाळ्यामध्ये तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर खरबुजाच्या रसाचे सेवन करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. खरबुजामध्ये भरपूर प्रमाणात पाणी आणि फायबर आढळून येते. त्यामुळे हा रस प्यायल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि तुम्ही जास्त खाणे टाळतात. परिणामी वजन नियंत्रणात राहते.

उन्हाळ्यामध्ये खरबुजाचा रस प्यायल्याने आरोग्याला वरील फायदे मिळू शकतात. त्याचबरोबर टॉन्सिलची सूज आणि वेदना दूर करण्यासाठी तुम्ही खालील घरगुती उपाय करू शकतात.

आले (Ginger-For Tonsils)

आल्यामध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात. त्याचबरोबर आल्यामध्ये अँटीइफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात, जे घशाला  संसर्गापासून दूर करण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला दोन ग्लास पाण्यामध्ये आल्याचा एक तुकडा दहा ते पंधरा मिनिटे उकळून घ्यावा लागेल. हे पाणी तुम्हाला गाळून कोमट करून प्यावे लागेल. याचे नियमित सेवन केल्याने घशाचा संसर्ग दूर होऊ शकतो.

लसूण (Garlic-For Tonsils)

टॉन्सिलच्या समस्येवर मात करण्यासाठी लसूण उपयुक्त ठरू शकतो. लसणामध्ये अँटीइफ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टरियल गुणधर्म आढळून येतात, जे टॉन्सिलच्या संसर्गाशी लढण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला लसणाच्या काही पाकळ्या बारीक करून घ्याव्या लागतील. दिवसातून दोन ते तीन वेळा या लसणाच्या पेस्टचे मधासोबत सेवन केल्याने टॉन्सिलच्या वेदना कमी होऊ शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या