“मुस्लिम चार विवाह करतात, धनंजय मुंडेंनी दोन केले तर काय बिघडलं?”

राज्याच्या राजकारणात सद्या एक चर्चेचा विषय समोर आलाय. राजकीय वर्तुळात याबाबत चर्चेला उधाण आलय. राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्याची बातमी समोर आली. २००६ सालापासून धनंजय मुंडे तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते अशी तक्रार ओशिवरा पोलिस ठाण्य़ात रेणू शर्मा या महिलेने केली होती.

यावर आता मुंडे यांना दोन पत्नीसंदर्भातील द्विभार्या प्रतिबंधक कायदा लागू होऊ शकत नाही. धनंजय मुंडे यांनी कायद्याचे उल्लंघन केलं नाही, असं म्हणत महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी पाठराखण केली.त्याचबरोबर मुस्लिम नागरिक चार विवाह करु शकतात, मग हिंदू व्यक्तीने दुसरे लग्न केले, तर चुकीचे काय?, असा सवालही सेंगर यांनी विचारला.

सेंगर म्हणाले की, “भारताच्या राज्यघटनेने सर्व धर्म समभाव तत्त्व स्वीकारले आहे. त्यामुळं सर्व धर्मांना विवाह बंधनाचे वेगवेगळे कायदे असू शकत नाहीत. असले तरी ते निरर्थक ठरतात. फक्त हिंदू धर्मीयांनाच द्विभार्या प्रतिबंधक कायदा लागू होऊ शकत नाही.”

दरम्यान, मात्र धनंजय मुंडे यांनी हे फेसबुक पोस्टद्वारे आरोप फेटाळून लावले आहेत. 2019 पासून करूणा शर्मा त्यांची बहीण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जिवीतीला गंभीर शारीरिक इजा करण्याच्या, धोका करण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील सहभागी होता. असं मुंडे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.