MVA | सरकारविरोधात 17 डिसेंबरला महाविकासआघाडीचा महामोर्चा

MVA | मुंबई : आज महाविकास आघाडी (MVA बैठक पार पडली. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. तसेच, सरकार विरुद्ध महाविकास आघाडी महामोर्चा काढणार असल्याचं घोषित करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह अजित पवार (Ajit Pawar) यांनी ही घोषणा केली आहे.

राज्यपालांना हटवण्याची मागणी महाविकासआघाडीने केली आहे. पण त्याआधी जरी राज्यपालांना हटवलं गेलं तरी मोर्चा हा निघणारच असं विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे.

यादरम्यान, 8 तारखेला सर्वपक्षीय बैठक होणार आहे. आमच्या काही घटक पक्षांनी देखील या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. सर्व नागरिकांनी देखील यावं अशी विनंती करत आहेत. बेरोजगारीचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. शिंदे आणि फडणवीस हे आपयशी राहिले आहेत. उद्योग महाराष्ट्रातून जात आहेत आणि जे आहेत ते देखील घालवत आहेत, असं देखील अजित पवार यांनी म्हटलं आहे.

याबाबत बोलताना, महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांच्या विरोधात हा मोर्चा असणार आहे. न भुतो न भविष्यती असा हा मोर्चा असेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.