“माझी लढाई एक प्रकारची क्रांती, आता शांत बसणार नाही”

मुंबई : सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत आहेत. भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप लावले आहेत. अशातच आज किरीट सोमय्या कोल्हापूरातील सेनापती संताजीराव घोरपडे कारखान्याची पाहणी करण्यासाठी जाणार होते. पाहणीनंतर ते पत्रकार परिषद घेऊन ग्रामविकासमंत्री यांच्यावर घोटाळ्याचा नवीन आरोप करणार होते. मात्र त्यांना कराडमध्ये पोलिसांनी आडवून रेल्वेतून खाली उतरवलं.

कराडमधून परतल्यानंतर त्यांचे होम ग्राऊंडवर म्हणजेच मुलुंडमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. ‘किरीटजी तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं…’ अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणादून सोडला होता. कार्यकर्त्यांनी दिलेल्या उर्जेनंतर किरीट सोमय्या देखील चार्ज झाले आणि यावेळी मात्र शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना लक्ष्य केले. त्यांनी संजय राऊत यांच्यावर घोटाळ्याचा आरोप करत त्याच आवेशाने त्यांनी ठाकरे सरकारच्या मंत्र्यांवर आणि नेत्यांविरोधात गंभीर आरोप केले.

ठाकरे सरकारने महाराष्ट्राची ओळख भ्रष्टाचारयुक्त राज्य म्हणून तयार केली. कोरोनाकाळात ठाकरे सरकारकडून मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार केला गेला. रेमडेसिव्हीर, औषधांमध्ये घोटाळे केले गेले. सरकारने मयताच्या टाळूवरचं लोणी खाल्लं. कोरोना काळात ठाकरे सरकारने स्व:तचे खिसे भरले, पण आम्ही महाराष्ट्र घोटाळेमुक्त, भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करुन दाखवू, असं सोमय्या म्हणाले.

मी लढत असलेली एक प्रकारची क्रांती आहे. मी आता शांत बसणार नाही. माझी लढाई घोटाळेबाजांविरोधात आहे. मी यांचे घोटाळे उघड केल्याशिवाय गप्प बसणार नाही. ठाकरे सरकारची दादागिरी सुरु आहे. पण ही दादागिरी जास्त दिवस चालू शकत नाही. पवार आणि ठाकरेंचे मुश्रीफांना वाचविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण या लोकांना भ्रष्टाचारी मंत्र्यांवर कारवाई करावीच लागेल, असा दावाही सोमय्या यांनी केला.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या