“माझं शरद पवारांना आव्हान आहे की, डोक्यात दगड घालायचं…”

सोलापूर : ‘शरद पवार हे साडेतीन जिल्ह्यांचे स्वामी आहेत. ते मोठे नेते आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोणी तसं मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे,’ अशी बोचरी टीका गोपीचंद पडळकर यांनी सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेत केली होती. यानंतर हि टीका खूप चर्चेत आलीय. यानंतर यांच्या गाडीवर बुधवारी रात्री दगडफेक झाली. दगडफेकीनंतर पडळकर चांगलेच आक्रमक झाले आहेत.

“माझ्या राज्यभर घोंगडी बैठकांमुळे राष्ट्रवादी जागेवरून हललीय. मुद्द्यांची बात करणारी राष्ट्रवादी गुद्द्यांवर आलीय. राष्ट्रवादीचा खरा चेहरा लोकांसमोर आला आहे. बहुजनांवर अन्याय करणारे हे लोक आहेत. माझं शरद पवारांना आव्हान आहे की त्यांनी सांगावं, मुद्यावर बोलत असताना डोक्यात दगड घालायचं हे कोणत्या कलमात लिहलं आहे”, असा हल्लाबोल गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

मी शरद पवारांवर काय टीका केली होती… मग मी बोललेलं इतकं वाईट वाटत असेल तर तुम्ही मोदींवर का बोलता?, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. माझा आवाज कोणी दाबू शकत नाही. अजित पवारांनी आरक्षण घालवलं. ओबीसींचं आरक्षण यांच्या नाकर्तेपणामुळे गेलं. बहुजनांना जागं करण्याचा माझा प्रयत्न आहे, असं पडळकर म्हणाले आहेत.

दरम्यान, गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर विरोधी पक्षनेेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी फोनवरून विचारपूस केल्याचं पडळकरांनी सांगितलं आहे. आपण विचारांची लढाई विचारांनी लढू, असं आवाहान देखील त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा