माय मरो आणि गाय जगो हे आमचं हिंदुत्व नाही : उद्धव ठाकरे

मुंबई : शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा षण्मुखानंद सभागृहात आज पार पडला. प्रतिवर्षी शिवाजी पार्कवर होणार सोहळा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी “आपला आवाज कोणी दाबू शकत नाही, आपला आवाज दाबणारा जन्माला यायचाय,” अशी सुरुवात करत अनेकांवर बाण डागला.

यानंतर आज शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विरोधकांवर तुटून पडले. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात झालेले दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपला लक्ष्य करताना मोठ्या प्रमाणावर टीका केलीय. सावरकर-गांधी शब्द उच्चारण्याची तुमची लायकी नाही. नवहिंदुत्वापासून हिंदुत्वाला धोका आहे.

मोहन भागवतांचे विचार त्यांनी म्हटलंय हिंदुत्व म्हणजे सर्वांचे पूर्वज एक होते, हे जर आपल्याला मान्य असेल तर विरोधी पक्षाचे पूर्वज परग्रहावरुन आले होते का?, असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. माय मरो आणि गाय जगो हे आमचं हिंदुत्व नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आपण मेळाव्यात विचार मांडतो ते पाळणार नसेल तर दसरा मेळाव्यांची काय गरज आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा