InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘माझ्या जन्मदिवसापेक्षा माझ्या आईचा वाढदिवस महत्वाचा’

आदरणीय खा. शरद पवार यांचा जन्मदिनानिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बळीराजा कृतज्ञता दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी मंत्री व छगन भुजबळ यांनी पवार साहेबांविषयी मनोगत व्यक्त करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

माझ्या जन्मदिवसापेक्षा माझ्या आईचा वाढदिवसही त्याच दिवशी असतो हे महत्त्वाचे आहे. आईने आम्हाला खूप कष्टाने वाढविले आहे. माझी आई आणि महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस मला नेहमी लढण्याची प्रेरणा देत असते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

Loading...

शरद पवार यांनी आपल्या आईच्या आठवणींविषयी बोलताना सांगितले, की शेतात जे काही पिकेल ते बाजारात पोचविण्याचे काम माझी आई करत होती. 1936 मध्ये माझी आई पहिल्यांदा निवडून आली आणि महिलांसाठी काम करता येते हे तिने दाखवून दिले. मुलींचे शिक्षण हा त्यांचा आयुष्यभर आग्रह होता. आपली बांधिलकी समाजातील शेवटच्या माणसाशी आणि समाजातील नव्या पिढीशी आहे, असे माझ्या सर्व सहकाऱ्यांना आज मला सांगायचे आहे.

- Advertisement -

You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.