इंदिरा गांधी यांच्याप्रमाणेच माझा ‘पीएसओ’ माझी हत्या करू शकतो – अरविंद केजरीवाल

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याप्रमाणेच माझा ‘पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर’ (पीएसओ) माझी हत्या करू शकतो, माझं आयुष्य दोन मिनिटांत संपू शकतं, असं धक्कादायक विधान केजरीवाल यांनी पंजाब केसरीला दिलेल्या मुलाखतीत केलं आहे.

माझ्या अवतीभवती जे सुरक्षारक्षक आहेत, ते सगळे भाजपाला रिपोर्ट करतात. भाजपाचे नेते माझ्या ‘पीएसओ’करवी मला ठार मारू शकतात. माझ्या जिवाला त्यांच्यापासूनच धोका आहे, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय. या संबंधीचं वृत्त ‘नवभारत टाइम्स’ने दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.