विधानपरिषदेत माझा मतदानाचा अधिकार संजय राऊत यांनाच देऊन टाकावा; देवेंद्र भुयार यांचा खोचक टोला

मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी झालेल्या लढतीत भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत ९ मते फुटल्याची चर्चा होती. ज्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी थेट आमदारांची नावं घेत त्यांनीच दगा दिल्याचा आरोप करुन एकच खळबळ उडवून दिली होती.

यामध्ये बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांची तीन मतं आम्हाला मिळाली नाहीत. करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे, लोह्याचे आमदार शामसुंदर शिंदे, स्वाभिमानीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी मतं दिली नाहीत, अशी माहिती राऊत यांनी प्रसार माध्यमांना दिली होती. यानंतर विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर आता देवेंद्र भुयार यांनी एक अजब प्रस्ताव मांडला आहे.

देवेंद्र भुयार मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले कि, मी परवाच्या बैठकीत महाविकास आघाडीसमोर एक प्रस्ताव मांडणार आहे. त्यानुसार विधानपरिषद निवडणुकीसाठी मी मतदान करायला जाईन तेव्हा संजय राऊत यांना माझ्यासोबत पाठवावे. मी मतदान करताना संजय राऊत माझ्या टेबलाच्या समोर उभे राहतील. मी त्यांना मत दाखवून मतपेटीत टाकेन. तसेच पुढे हे शक्य नसेल तर दुसरा पर्याय म्हणजे विधानपरिषदेत मतदाना करण्याचा माझा अधिकार संजय राऊत यांनाच देऊन टाकावा. ते त्यांच्याच हाताने मतपेटीत मत टाकतील.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा