नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचीच ‘पंचाईत’; देवेंद्र फडणवीसांचा टोला

मुंबई : सध्या राज्यात नगरपंचायत निवडणुकीमूळे वातावरण तापलं आहे. या निवडणुकांचे आज निकाल लागले आहेत. यामध्ये काही ठिकाणी महाविकासाआघाडी विरुद्ध भाजप अशी पाहायला मिळाली. नगरपंचायत निवडणूकीत महाविकास आघाडीला ८० टक्के जागा मिळाल्या आहेत याचा अर्थ भाजपला जनतेने नाकारले आहे, अशी टीका महाविकास आघाडी कडून करण्यात येत आहे.

मात्र भाजपा क्रमांक एकचा पक्ष होता आणि राहिल, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. भाजपाच्या २४ आणि सहयोगी मिळून सर्वाधिक ३० नगरपालिकांमध्ये भाजपाने सत्ता प्राप्त केली. सदस्यसंख्येत सुद्धा सर्वाधिक ४१५ हून अधिक जागा जिंकत भाजपा हाच क्रमांक एकचा पक्ष बनला आहे.” असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी राज्यात निवडून आलेल्या सर्व उमेदवार आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.

यानंतर यावरून पुढे देवेंद्र फडणवीस म्हणालेकि, ज्या पक्षाचा राज्यात मुख्यमंत्री आहे, तो पक्ष चौथ्या क्रमांकावर गेला याचा विचार त्यांनी केला पाहिजे, महाविकास आघाडीतील शिवसेना आणि कॉंग्रेसच्या जोरावर राष्ट्रवादी राज्यात आपली ताकद वाढवत आहे. विशेषतः शिवसेनेच्या मतदारसंघात जिथे राष्ट्रवादीचा उमेदवार पराभूत झाला तिथे त्याला ताकद देण्याचे काम त्यांचे नेते करतायेत.

त्यामुळे शिवसेनेच्या विद्यमान आमदाराला निधी मिळत नाही, त्याचे काम होत नाही, पण पराभूत झालेल्या, दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचे काम होते ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे काल हाती आलेल्या नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर खरी पंचाईत शिवसेनेचीच झाली असल्याचा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा