InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

नागपुरमध्ये राष्ट्रगीताने मूक मोर्चाची सांगता

मराठा क्रांती मूक मोर्चा आज हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये सुरू झाला. नागपुरातील यशवंत स्टेडिअमवरुन दुपारी सव्वा बाराच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली आहे.  मॉरिस कॉलेज टी पाईंटजवळ मोर्चा संपेल. नागपूरमध्ये मुक्कामी येणाऱ्या मोर्चेकऱ्यांसाठी १५ मंगल कार्यालयात निवासाची व्यवस्था केली आहे. इतर समाजाच्या लोकांनीही मोर्चाचं समर्थन केलं आहे. मोर्चाच्या सुरूवातीला तरुणी, महिला, वकील, डॉक्टर, मेडिकलचे विद्यार्थी, पुरुष, राजकीय नेते या क्रमाने मोर्चा मॉरिस टी पाईंटच्या दिशेने रवाना झाला.

भगवे फेटे घालून शिवसेनेच्या सर्व मंत्री – आमदारांची विधानभवन पायऱ्यांवर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी घोषणा. शिवसेनेचे आमदार भगवे फेटे घालून मराठा क्रांती मूक मोर्चात सहभागी होणार आहेत. दरम्यान, या मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बंदोबस्ताशिवाय वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष तुकडी तैनात करण्यात आल्याची माहिती सह पोलीस आयुक्त संतोष रस्तोगी यांनी दिली आहे. याशिवाय मोर्चातील हालचालींवर विशेष कॅमेऱ्यांची नजर असेल. १ अतिरिक्त आयुक्त, ६ अतिरिक्त उपायुक्त, ८ एसीपी, १८० पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक आहेत.

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.