InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

उमेदवार यादीत नितीन गडकरी यांच्या नावापुढे ‘रिजेक्टेड’चा शिक्का

आज महाराष्ट्रात 2019 च्या लोकसभा निवडणूकीसाठी टप्प्यासाठी 7 मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. नागपुरात देखील आज सकाळपासून मतदान सुरू आहे. भाजपचे उमेदवार नितीन गडकरी, सरसंघचालक मोहन भागवत यांनी देखील नागपुरमध्ये आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडले.

मात्र आता नागपुरातील न्यू इंग्लिश स्कूलमधल्या मतदान केंद्रावर चक्क उमेदवार यादीवरच रिजेक्टेडचे शिक्के मारण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे भाजप उमेदवार नितीन गडकरी यांच्या नावापुढे ‘रिजेक्टेड’ असा शिक्का मारण्यात आला होता.

मतदारांना उमेदवारांची माहिती व्हावी, यासाठी मतदान केंद्राबाहेर उमेदवारांची यादी लावली जाते. मात्र या यादीवर गडकरींच्या फोटो आणि नावापुढे ‘रिजेक्टेड’ असे शिक्के मारण्यात आले होते. हे शिक्के कुणी मारले हे अद्याप अस्पष्ट आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.