‘नागडे राजकारणी, नागडं सरकार, नागडा देश, आरे हाड…’; आस्ताद काळेची पोस्ट व्हायरल

मुंबई : कोरोनामुळे देशात हाहाःकार उडाल्यानंतर आता देशभरातून राजकारणी आणि सरकारवर टीका होताना दिसते आहे. दरम्यान मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आस्ताद काळे याने सरकार आणि राजकारण्यांवर ताशेरे ओढले आहेत. अस्तादने यासंदर्भात केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे.

आस्तादने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार, राज्य सरकार, राजकारणी यांना सवाल केला आहे. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

प्रश्न विचारायचे आहेत…स्वत्व जपायचं आहे….कदाचित जीव गमवावा लागू शकतो…कारण..श्शु!!! कुठे काही बोलायचं नाही….अरे हाड…..आम्ही प्रश्न विचारणार….सत्तेच्या आणि सत्तेतल्या प्रत्येकाला, असं अस्ताद काळेने म्हटलं आहे. उत्तरं न देता आम्हाला गप्प करू बघाल तर तुम्ही किती नागडे आहात तेच दिसणार…..नागडे राजकारणी…नागडं सरकार…नागडा देश….निरोप घेतो, असंही अस्तादने म्हटलं आहे. आस्ताद काळेच्या या पोस्टवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.

सध्याच्या घडीला निवडणूक घेणं महत्त्वाचं आहे की परिस्थिती आटोक्यात आणणं महत्त्वाचं आहे. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडे एक वर्षे होते. मग ते राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार..तुम्ही एका वर्षात केलंत काय ?, असा सवालही आस्तादने केला.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.