नवी मुंबईतील विमानतळाला ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’ यांचं नाव: एकनाथ शिंदे

मुंबई : नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून स्थानिक नागरिक विरुद्ध राज्य सरकार अशी खडाजंगी सध्या पाहायला मिळत आहे. त्यातच आता नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विमानतळाच्या नावाची माहिती दिली आहे.

“नवी मुंबईतील विमानतळाला हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात येणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. नवी मुंबईतील विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात येईल. तर भविष्यातील दुसऱ्या मोठ्या प्रकल्पाला दिवंगत खासदार दि. बा. पाटील यांचं नाव दिलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संघर्ष समितीला दिलं आहे,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यावर राज्य सरकार ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला स्थानिक नागरिक शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत नेते दि. बा पाटील यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी करत आहेत. त्यामुळे आता स्थानिक नागरिक व राज्य सरकारमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा