“सामनाचं नाव आता पाकिस्ताननामा किंवा बाबरनामा करा”

मुंबई : फाळणीचा दिवस विसरु नका,’ असे पंतप्रधान मोदींचे फर्मान आहे. देशाचे विभाजन म्हणजे अराजकच होते. पाकिस्ताननिर्मितीचे गुन्हेगार हे फक्त महात्मा गांधींना ठरवून नथुराम गोडसेंनी गांधींवर गोळ्या झाडल्या. गांधींना मारण्यापेक्षा बॅ. जीनांवर हा प्रयोग झाला असता तर फाळणीचा स्मृतीदिन साजरा करण्याची वेळ आली नसती. असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कालच्या सामनाच्या रोखठोकमध्ये म्हटलेलं आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. “सामनाने आता नाव बदलून टाकावं, सामनाने त्याचं नाव पाकिस्तान नामा किंवा बाबरनामा करावं.” अशी घणाघाती टीका शेलार यांनी केली आहे.

पुढे आशिष शेलार म्हणाले की, “संजय राऊत यांनी कितीही प्रयत्न केला तरी या देशाचा वेगळा इतिहास लिहिण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना त्यांनी बळ देण्याचा हा प्रयत्न आहे. जीना यांनी फाळणी केली याबद्दल दुमत असण्याचं कारणच नाही. गोळीबार, हल्ला किंवा खून गाधीजींचा याचं कुणी समर्थन करण्याचा विषयच नाही. संजय राऊत, विपर्यासाचं विच्छेदन करून सत्याला लपवता येत नाही. असं शेलार म्हणाले.

तसेच भारतीय लोकांच्या फाळणीच्या आठवणींना एक अर्थाने इतिहासातून धडा घेऊन, नवा इतिहास घडवण्यासाठीचा तो दिवस पंतप्रधान मोदींनी घोषित केला तर, पाकिस्तानच्या पोटात दुखायला लागलं आणि जे पाकिस्तानच्या पोटात दुखायला लागलं. त्याच पद्धतीच्या भावना संजय राऊत रुपी संपादकाच्या हातून सामनात उतरायला लागल्या.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा