ऑलिम्पिक मधल्या पाकिस्तानी घोड्याचे ठेवले ‘हे’ नाव ; भारताने घेतला आक्षेप

ऑलिम्पिकसाठी पात्र ठरवण्यात आलेल्या पाकिस्तानच्या एका घोडेस्वाराने आपल्या घोड्याचे नाव ‘आझाद काश्मीर’ असे ठेवले आहे. पाकिस्तानी खेळाडूच्या या कृत्यावर भारताने आक्षेप नोंदवला आहे.जपानमधील टोकियो शहरात या वर्षी ऑलिम्पिक स्पर्धा पार पडणार आहे.

‘….म्हणून मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कुटुंबाने काढलेल्या अल्बमसाठी 500 रुपये द्यायचे होते’

या स्पर्धेसाठी उस्मान खान हा पाकिस्तानी घोडेस्वार पात्र ठरला असून ज्या घोड्यावर बसून उस्मान स्पर्धेत उतरणार आहे, त्या घोड्याचे नावच त्याने ‘आझाद काश्मीर’ असे ठेवले आहे. या क्रिडा प्रकारात भारताकडून फवाद मिर्झा हा ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

Loading...

दरम्यान, उस्मान खान याने स्पर्धेतील आपल्या घोड्याचे नाव ‘आझाद काश्मीर’ ठेवल्यानंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेने याचा निषेध केला आहे. या प्रकाराविरोधात कायदेशीररित्या तक्रार दाखल करता येते का याचा विचार संघटना करत असून, तशी चाचपणी भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.