“दलित आणि मुस्लिम समाजातील लोकांची नावे मतदार याद्यांमधून…” : जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे. अशातच राष्ट्रवादी नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मतदार याद्यांवरुन जिल्हाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

आव्हाड यांनी यासंबंधित एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. यामध्ये त्यांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यावर देखील थेट आरोप केला आहे. राज्यातील बऱ्याच ठिकाणी दलित आणि मुस्लिम समाजातील लोकांची नावे मतदार याद्यांमधून गहाळ झाल्याचा आरोप करत. गहाळ झालेल्या नावांसाठी जिल्हाधिकारी जबाबदार असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडीओतून सांगितले आहे.

मुंब्राच नाही तर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मतदार संघातील मतदार याद्यांमध्ये घोळ करण्यात आला आहे. माझ्या मतदार संघातील देखील 20 ते 40 हजार नावे वगळण्यात आली आहेत. नाव वगळताना ते मतदार स्थलांतरीत झाल्याचा शेरा देण्यात आला आहे. परंतु प्रत्यक्षात ते लोक कोठेही स्थलांतरीत झाले नाहीत, तिथेच राहत आहेत. मग ही नावे बदलली कोणी?, असा सवाल आव्हाडांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा